"अभियांत्रिकी प्रवेशाचा मार्ग : संधी, प्रक्रिया आणि तयारी"
अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच पालकांसाठी प्रवेश प्रक्रियेविषयी सविस्तर आणि विश्वासार्ह मार्गदर्शन देणारी विशेष मुलाखत मालिका आकाशवाणी परभणी केंद्रावर प्रसारित होत आहे.
या मालिकेत पुढील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे :
✅ JEE व MHT-CET परीक्षांचे महत्त्व
✅ अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया व CAP फेऱ्या
✅ पात्रता, आरक्षण व आवश्यक कागदपत्रे
✅ महाविद्यालय व शाखा निवडीचे निकष
✅ AI, Data Science, Mechanical, Civil, Electronics इत्यादी क्षेत्रांतील करिअर संधी
✅ विद्यार्थी व पालकांसाठी उपयुक्त मार्गदर्शन
तज्ज्ञ मार्गदर्शक:
डॉ. किरण सानप – SGGS अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया प्रमुख
डॉ. मनेश कोकरे – संचालक, SGGS अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण महाविद्यालय, नांदेड
दिनांक : २६ ते २९ जून २०२६
⏰ वेळ : सकाळी १०.०० वाजता
MW Band – 1305 kHz
FM Band – 102 MHz
NewsOnAir मोबाईल अॅपवर उपलब्ध
विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि करिअर मार्गदर्शकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व अभियांत्रिकी प्रवेशासंदर्भात योग्य माहिती मिळवून सुजाण निर्णय घ्यावा.